Wednesday, 13 August 2014

कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी

टी व्ही वर कबड्डीचे सामने पाहताना मराठी शाळेची आठवण झाली. मुंबईवरून गावाला आलेलो असल्याने स्पेशल ट्रीटमेंट मिळायची मला.. मजा यायची या शाळेत.. आमचे आवडीचे खेळ जोडसाखळी आणि ईशामृत. जोडसाखळीत खेळाडू कितीपण चालतील पण संख्या सम पाहिजे एकावर राज्य आल्यावर एक मोकळा राहिला पाहिजे. राज्यावाल्याने जो एकटा असेल त्यालाच पकडायच बाकीच्यांनी त्याला जोड देऊन वाचवायच.. ईशामृतमधे कितीपण खेळाडू चालायचे ज्याच्यावर राज्य आल तो ईशावाला.. बाकीचे सगळे अमृतावाले, राज्यावाल्याचा स्पर्श झाला की ईश यायच.. मग गप खाली बसून रहायच बाकीच्यांकडून अमृत भेटत नाही तोपर्यंत..पण उभ असताना पकडल तर मग आउट.. ईशामृताचा असा साधासोप्पा खेळ.. कबड्डीपेक्षा हेच खेळ जास्त खेळायचो.. हे खेळ खेळतानाही हाताने मांडीवर थाप मारून 'तुह्या मायला ये इकड तुह्याक बगतो' अस आव्हान द्यायचे बाकीचे, हे आव्हान देण मला शेवटपर्यंत नाही जमल.. शाळेचे एक ते चौथीच अर्ध वर्ष मुंबईत होतो पण या साडेतीन वर्षापेक्षा गावच्या झेडपीच्या शाळेतले सहा महीनेच जास्त लक्षात राहिलेत..
  _/\_

No comments:

Post a Comment